साईमत, जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन जामनेर भाजपाच्या शहर चिटणीसपदी जगदीश बाबुराव सोनार यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. यापूर्वीपासूनच पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत होतो. त्यापेक्षा अधिक वेळ देऊन शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिष झाल्टे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, ना.महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.