दुर्गम भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – न्या. सैय्यद

0
20

साईमत, जळगाव प्रतिनिधी

दुर्गम भागातील नागरिकांना राष्टाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश एस.पी.सैय्यद यांनी केले. शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी ॲड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांचा तृतीय पुण्यस्मरण निमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागात नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. त्या पसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन शंकर परदेशी, गंगाबाई परदेशी, छाया केळकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ न्यायाधीश एस.पी.सैय्यद यांनी आपल्या कार्यालया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ॲड. केतन सोनार व विधी सहाय्यक भारती कुमावत, ॲड. ऐश्वर्या मंत्री यांनी बाल संरक्षण व मानवी तस्करी, महिलांचे हक्क व अधिकार, शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव एस.पी.सैय्यद, ॲड. केतन सोनार, विधी सहाय्यक भारती कुमावत, ॲड. ऐश्वर्या मंत्री, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख उपस्थित होते.

यशस्वितेसाठी संतोष केळकर, राखी परदेशी, रसिका परदेशी, महेंद्र परदेशी, रोशनी फरसे, प्रेम केळकर यांचे श्रमिक योगदान लाभले. मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मीना परदेशी तर आभार  छाया केळकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here