पाळधी शाळांमध्ये उच्च न्यायालयाच्या पथकाकडून तपासणी

0
94

साईमत, लोहारा, ता.पाचोरा

उच्च न्यायालयाच्या पथकाने पाळधी गावातील जिल्हा परिषद शाळेत भेट देत शाळांमधील भौतिक सुविधांची परिस्थितीची पाहणी करुन तपासणी केली. यावेळी समितीत जळगाव जिल्हा न्यायाधीश एस.एन.राजुरकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाले उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व परिसरात समितीने भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुलांसोबत चर्चा केली. यावेळी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहार, पिण्याचे पाणी, शैक्षणिक ज्ञानाविषयी समितीने मुलांना प्रश्न विचारले.

यावेळी गावातील मुलां-मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. ईश्वर चोरडिया, सागर बावस्कर, पोलीस पाटील प्रवीण पाटील उपस्थित होते. यावेळी समितीसमोर शाळेतील समस्याविषयी प्रा.ईश्वर चोरडिया यांनी काही प्रश्न समिती समोर मांडले. याबाबत समितीने शाळेतील समस्यांविषयी लवकर वरिष्ठांना कळवून योग्य निर्णय घेऊन निरसन करण्यात येईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here