Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Vande Bharat Food Controversy : वंदे भारतमधील जेवणात कीडा; प्रवाशाचा संताप, विक्रेत्यावर १० लाखांचा दंड
    जळगाव

    Vande Bharat Food Controversy : वंदे भारतमधील जेवणात कीडा; प्रवाशाचा संताप, विक्रेत्यावर १० लाखांचा दंड

    saimatBy saimatApril 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगाव

    अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील एका प्रवाशाला जेवणात कीडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रवाशाने हा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर फोटो आणि व्हिडिओसह शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

    शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डाळ-भाताच्या डब्यात झुरळासारखा कीडा दिसून आला. विशेष म्हणजे, त्याच डब्यात अशा दोन घटना घडल्याचेही प्रवाशाने नमूद केले असून, यामुळे इतर प्रवाशांनी जेवण करणे थांबवल्याची माहिती दिली.

    हे जेवण ‘RK ग्रुप’अंतर्गत येणाऱ्या ‘M/S वृंदावन फूड प्रॉडक्ट्स’ या विक्रेत्याकडून पुरवले गेले होते. प्रवाशाने संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि विक्रेत्याच्या युनिटवर छापा टाकण्याची मागणी केली. तसेच, अन्न FSSAI च्या निकषांनुसार तयार केले जात नसल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

    दरम्यान, या घटनेची दखल घेत IRCTC ने संबंधित सेवा पुरवठादारावर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, कंत्राट रद्द करण्याची नोटीसही बजावली आहे. तसेच, स्वयंपाकघर सील करून स्वच्छता व कीटक नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

    IRCTC ने प्रवाशांची माफी मागत, “प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. स्वच्छता आणि प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे स्पष्ट केले.

    ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडील काळात अशा घटना वारंवार समोर येत असल्याने, केवळ माफीपुरते मर्यादित न राहता सेवेत ठोस सुधारणा करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव हादरले! विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बेड्या.

    April 8, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026

    उन्हाळी सुट्टीत एसटी प्रवास महाग; १० टक्के भाडेवाढ आणि स्वच्छता अधिभार लागू

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.