‘एक पेड माँ के नाम’ राबविला उपक्रम, स्वदेशी झाडांची केली लागवड
साईमत। धरणगाव।प्रतिनिधी।
येथील प.रा. हायस्कुल सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार १७ सप्टेंबर रोजी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय शिंगाणे, एनसीसीचे विभाग प्रमुख डॉ. अरुण वळवी, धरणगाव शहराचे पी.आय. संतोष पवार यांच्या हस्ते स्वदेशी झाडांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. केंद्रे, डॉ. वारडे, डॉ. कांचन महाजन, प्रा. पालखे, डॉ. बोंडे, ग्रंथपाल देशमुख, प्रा. क्षत्रिय, किरण सुतारे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी, डॉ. गौरव महाजन, विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक उपस्थित होते. सकाळच्या सत्रात महाविद्यालयातील रासेयोच्या स्वयंसेवकांतर्फे विज्ञान विभागाचा परिसर स्वच्छ करून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पंधरवड्यात करणार परिसराची स्वच्छता
येत्या पंधरवड्यात उपक्रमांतर्गत दत्तक गाव अनोरे, धरणगाव रेल्वे स्टेशन तसेच ख्वाजाजी नाईक स्मृतीस्थळ आदी परिसराची स्वच्छता रासेयोचे विद्यार्थी स्वयंसेवक करणार आहेत.