कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अंधाधुंद कारभार

0
6

साईमत लाईव्ह

जळगाव ः विशेष प्रतिनिधी

जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील लेखा सहाय्यक पी.एम. पाटील नामक कर्मचाऱ्याचे आपल्या मर्जीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे वाटपाचा घोळ नुकताच उघडकीस आला आहे. त्यात अडचणीत आलेल्या कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पी. एम. पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे.
यासह मनमर्जीप्रमाणे कामे देण्यासाठी शासकीय कागदपत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन काम करणे ह्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडत आहे. कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी ह्यांनी मात्र या प्रकरणी आपले हात वर केले आहेत. त्यामुळे श्री. पाटील नॉट रिचेबल येत असून भुयारात गेले आहेत.

जळगाव जि.प.च्या ह्या कामे वाटपाच्या व कागदपत्रे गहाळ कारनामाच्या उघड प्रकरणात मोठ्या अधिकाऱ्यांची नावे शामिल असल्याने तूर्तास पी.एम. पाटील यांची तडकाफडकी दुसऱ्या विभागात बदली करून प्रकरणावर माती लोटण्यात आली आहे. मात्र कागदपत्रे,दिलेली कामे व केलेला घोळ यासह तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारी या तर जिवंत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना कामे वाटपात उपाशी ठेवीत आपल्या जवळच्या काही हस्तकांना दहा टक्केपेक्षा जास्त मलिदा घेऊन कामे वाटप करणे अधिकाऱ्यांच्या अंगलट आले
आहे.

सुशिक्षित बेरोजगारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात अनेक गौडबंगाल उघडकीस आले आहेत. ज्यात प्रामुख्याने शासकीय मंजुरी कामांची मनमर्जी तसेच आर्थिक फायद्याच्या तत्वांवर वाटप करण्यात आलेले शेकडो कामे,शासकीय कागदपत्रे खाजगी ठिकाणी नेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मिलीभगत व अभय असल्याने गैरफायदा घेत पी.एम.पाटील यांनी अनेक गरजू पात्र बेरोजगारांची फसवणूक तसेच शासकीय कामात मोठा घोटाळा केलाचे निष्पन्न झालेच. तरीही वरिष्ठांनी त्यांना पुन्हा आपल्या सावलीची छत्री देऊन, त्यांची तूर्तास बदली करून विभागाबाहेर करीत आपआपली भूमिका लपवून घेतली आहे.
परंतु त्यांनी केलेला घोळ व तक्रारी मात्र जिवंत आहेत. सदर प्रकरणात अनेक बडे अधिकारी असल्याचे समोर येत असतांनासुद्धा सीईओ पंकज आशिया यांनी अद्याप या प्रकरणी चुप्पी साधल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here