Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»मलेशियाला धूळ चारत भारताने चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी
    क्रीडा

    मलेशियाला धूळ चारत भारताने चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चेन्नई : वृत्तसंस्था

    भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा ४-२ असा पराभव केला. उत्तरार्धापर्यंत मलेशियाचा संघ ३-१ असा आघाडीवर होता. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ किताब आहेत.
    भारताकडून जुगलराज सिंह (१९ व्या मिनिटाला),हरमनप्रित सिंह (४५ व्या मिनिटाला),गुरजंत सिंह(४५व्या मिनिटाला)आणि आकाशदीप सिंह(५६ व्या मिनिटाला)यांनी गोल डागले तर तिकडे मिलेशियासाठी अजराई अबू कमाल, रजी रहीम आणि एम. अमीनुद्दीन यांनी गोल केले.
    या अंतिम मुकाबल्यात गोलची सुरुवात भारताकडून झाली. खेळाच्या ९ व्या मिनिटाला जुगलराज सिंह यांनी पेनल्टी कॉर्नरवर एक उत्कृष्ट गोल केला.त्यानंतर खेळाच्या १४ व्या मिनिटाला अजराई अबू कमाल याने फील्ड गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. मग खेळाच्या दुसरा क्वार्टर पूर्णपणे मलेशियाच्या नावे झाला. यात पाहुण्या संघाने दोन गोल केले.
    त्यानंतर १८ व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू असलेल्या रजी रहीम याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल डागला. पुढे २८ व्या मिनिटाला मोहम्मद अमीनुद्दीन याने देखील पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विशेष म्हणजे हाफटाइमपर्यंत मलेशिया ३-१ ने पुढे होता.
    भारताचे शानदार पुनरागमन
    त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटात भारताने दोन गोल केले. सर्वप्रथम कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पेनल्टी स्ट्रोकवर दमदार गोल केला. नंतर काही सेकंदांतच गुरजंत सिंहने फील्ड गोल डागत मुकाबला बरोबरीत आणला. नंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंह याने भारतासाठी निर्णायक गोल डागला.भारताने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकत पाकिस्तानला मागे सारले आहे.भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त केवळ कोरियाच ही स्पर्धा जिंकू शकलेला आहे. कोरियाने सन २०२१ साली हा किताब जिंकला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Pune : पुण्यातील बाणेरमध्ये ड्रग रॅकेटचा भांडाफोड; हळदीच्या पाकिटाखाली 16 किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत

    March 22, 2026

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026

    Cricket : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ८ गडी राखून हरवले; ५ टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.