Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»Gulabrao Patil : पालकमंत्र्यांच्या हस्ते बोरगाव बु. येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
    धरणगाव

    Gulabrao Patil : पालकमंत्र्यांच्या हस्ते बोरगाव बु. येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

    SaimatBy SaimatApril 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तीन दिवसांच्या भागवत सप्ताहाने गावात भक्तिरसाची उधळण :

     

    साईमत बोरगाव बु./ धरणगाव प्रतिनिधी

    बोरगाव बु. येथील मध्यवर्ती श्री मारोती मंदिर परिसरात २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारोती रायांची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व विधिवत पूजाविधीने संपन्न झाली.

    या शुभप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की, “ही प्राणप्रतिष्ठा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि गावकऱ्यांच्या एकतेचा उत्सव आहे. भागवत सप्ताह, सामाजिक सभागृह उभारणी आणि मंदिर कार्यात गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. गावाचा विकास पायाभूत सुविधा पुरवण्या बरोबर  अशा धार्मिक-सामाजिक उपक्रमातून संस्कृती निर्माण होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    या उपक्रमासाठी मूलभूत सुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानिमित्त तीन दिवसीय भव्य कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या पहील्या दिवशी ह.भ.प. संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर), दुसऱ्या दिवशी ह.भ.प.सौ कांचनताई जगताप (त्र्यंबकेश्वर) आणि समारोप ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या अध्यात्मिक कीर्तनरसातुन भक्ती भाव वातावरणात पार पडले. महाप्रसादाचा लाभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने उपस्थितांना देण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक भैया मराठे सर यांनी तर आभारप्रदर्शन मा. उपसरपंच नितीन पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच सौ. उषाबाई मराठे, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश मराठे, दीपक पाटील, किशोर शेडगे, बापू पवार, गोकुळ पाटील, किशोर मराठे, पिंटू पाटील, किशोर तोंडे, शाखा प्रमुख सुदाम मराठे यांची उपस्थिती होती. बोरगाव बु. व बोरगाव खु. येथील भजनी मंडळाच्या सुरेल भजनांनी सोहळ्याला भक्तिरसात रंग भरले. गावकरी, महिला, युवक आणि वयोवृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाची शोभा वाढवली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.