साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी दैनिक ‘साईमत’ वृत्तपत्राच्या “न्यूज फ्रेम”चे उद्घाटन करण्यात आले. याबद्दल उपस्थित मान्यवरांनी दै.’साईमत’चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.वाय.देवरे, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रा.पी.पी. चौधरी, आय.टी.आय.चे प्राचार्य के.बी.बाविस्कर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.शुभांगी चव्हाण, कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.संदीप पाटील, दै.’साईमत’चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील, शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील, सदस्य व्ही. डी. पाटील, संजय पाटील यांच्यासह युनिटचे प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.