बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शेंदुर्णी येथील गोपाला जिनिंग -प्रेसिंग आवारात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सिसीआय) च्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन व ट्रॅक्टरचे पूजन करुन करण्यात आले.शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या हमीभावाने (एमएसपी) कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येईल. याप्रसंगी सभापती अशोक भोईटे, सिसीआयच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाप्रबंधक श्री.दडमल, संजय गरुड, सुभाष पाटील, अशोक जैन, गोविंद अग्रवाल, कापूस उत्पादक शेतकरी गोकुळ चव्हाण, केंद्रप्रमुख के.पी.मीना, बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, राजेंद्र बिऱ्हाडे, नितीन व निलेश अग्रवाल, किरण बारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभाव व्यतिरिक्त अग्रीम बोनस मिळावे, म्हणून बाजार समितीतर्फे विनंती प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कपाशीला चांगला भाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सीसीआयच्याच खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती अशोक भोईटे यांनी केले आहे.