स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन

0
28

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूपेंद्र केसूर होते.
उद्घाटनप्रसंगी गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीतं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या मराठी आणि अहिराणी या खान्देशची ओळख असलेल्या अस्सल बोली भाषेतील ठसकेबाज गीतांनी सभागृह दणाणले.
व्यासपीठावर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक चौधरी, सूत्रसंचालन प्रा. योगेश धनगर यांनी केले. यशस्वितेसाठी कला मंडळ सदस्य प्रा.संध्या महाजन, प्रा.सुरेखा पाटोळे, प्रा.ईशा वडोदकर, प्रा.निलिमा खडके, प्रा.किरण कोळी, प्रा.मयुरी हरीमकर, प्रा.विजय भोई, प्रा.जयंत इंगळे, प्रा.सूर्यकांत बोईनवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here