साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कुत्रा आणि मांजर म्हटले तर लगेच आपल्याला आठवते ती त्यांची पारंपरिक वैरी. समाजात कुत्रा आणि मांजर यांना एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाते. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावात सध्या याउलट चित्र पहायला मिळत आहे.
येथील रहिवासी आकाश रवींद्रनाथ भालेराव यांच्या घरी १७ महिन्यांची ‘लाब्राडोर’ जातीची ‘डॉर्मी’ नावाची कुत्री आहे. ६ दिवसांपूर्वी भालेराव यांच्या घरासमोर डोळे न उघडलेल्या मांजराच्या पिल्लुचा खुप जोरात ओरडण्याचा आवाज आला. ते पिल्लू असे मरण पावले म्हणून त्याला भालेराव यांनी घरात आणले. मात्र, ते पिल्लू लहान असल्याने त्याला दूध प्यायला पण जमत नव्हते. भालेराव यांच्याकडील ‘लाब्राडोर’ जातीच्या ‘डॉर्मी’ या श्वानाने त्या मांजरावर आईप्रमाणे माया करत त्याला कुशीत घेतले. मांजराचे पिल्लू पण तिला आई समजून तिचे दूध प्यायला लागली. हे सर्व व्हीडिओ आणि फोटो भालेराव यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्याचे खूप लोकांनी आश्चर्यचकीत होऊन कौतुक केले. त्यामुळे अनोख्या मायलेकींचे कौतुक अनेक जण पाहण्यासाठी येऊ लागले आहेत.