पाचोऱ्यात बहुरूपीच्या माध्यमातून पत्रकाराने केली मतदान जनजागृती

0
63

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

देशभरात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाचोरा शहरात बहुरूपी बाहुल्यांच्या सोबत बाजारपेठेत लोकशाही टिकविण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी मतदान करा, अशा पद्धतीने मतदानाची जनजागृती पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून पत्रकार राहुल महाजन यांनी केली आहे. पत्रकार म्हणून शासनाला नेहमी सहकार्य करणे व निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाला मदत करणे हे आपले कर्तव्य तसेच नैतिक जबाबदारी आहे. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरात अनेक सुशिक्षित तरुण वर्ग विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असतात. आपण समाजामध्ये वावरत असतांना समाजाला काहीतरी देणे लागतो. मग आपले विचार, बुद्धी, ज्ञान तसेच कला जे समाजाला देता येईल ते आपण समाजाला दिले पाहिजे. अश्‍या हेतूने समाजात कायम सामाजिक बांधिलकी जपणारा एक छंद म्हणून पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेला सुशिक्षित युवक तरुण राहुल महाजन यांचा हॉटेल व्यवसाय आहे. ते समाजात पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक सामाजिक उपक्रम राबवित असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here