Shiv Sena Ubatha Group’s : जळगावात शिवसेना उबाठा गटाचा निर्धार मेळावा उत्साहात

0
1

शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगाव जिल्हा कार्यालयात शिवसेना उबाठा गटाच्यावतीने आयोजित महत्वपूर्ण निर्धार मेळावा बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. मेळाव्यात शेकडो महिलांसह पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या झेंड्याखाली काम करण्याची शपथ घेतली. मेळाव्यात शिवसैनिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सक्षम पर्याय जनतेसमोर उभा केला जाईल, असा निर्धार केला. मेळाव्यास शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोद घुगे उपस्थित होते.

मेळाव्यात विविध पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गटांमधून इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे अर्ज दाखल केले. त्यात दीपाली भाऊसाहेब सोनवणे (कानळदा-भोकर गट), मीराबाई गंगाधर घुगे (कुसुंबा खुर्द), ॲड. विशाल तुकाराम सोनवणे (विदगाव), योगेश नथू चौधरी, हनीफ मुशीर शेख, सुनील दगडू धनगर (म्हसावद), धनराज चराटे (म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गट), लताबाई सिताराम सपकाळे, छाया गुलाबराव कांबळे (कानळदा), राकेश घुगे (चिंचोली पंचायत समिती गण) अशा इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले.

यावेळी मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हाप्रमुख गुलाबराव कांबळे, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी, युवासेना तालुका प्रमुख किरण पवार, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख इमाम पिंजारी, तालुका समन्वयक भगवान धनगर, तालुका संघटक विशाल सोनवणे, उपप्रमुख अशोक पाटील, सचिन चौधरी, प्रभाकर कोळी, योगेश कोळी, ज्ञानेश्वर शेककुरे, सुकदेव बाविस्कर, धनराज वारडे, योगेश पाटील, किरण ठाकूर, राजुभाऊ पाटील, हिरालाल सोनवणे, राजू जगताप, स्वप्नील राजपूत, विलास कोळी, आनंद सोनवणे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याच्या शेवटी सर्व उपस्थितांनी “शिवसेनेचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत फडकवणारच” अशी शपथ घेत उत्साहात मेळाव्याची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here