Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगाव जिल्हा कारागृहात तिघे लाचखोर धुळे एसीबीच्या जाळ्यात
    क्राईम

    जळगाव जिल्हा कारागृहात तिघे लाचखोर धुळे एसीबीच्या जाळ्यात

    SaimatBy SaimatNovember 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्‍यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा सापळा बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता यशस्वी करण्यात आला.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा ३०७ च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवार, ७ रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. तिघाही संशयितांनी दोन हजारांची लाच भेट घडवून आणण्यासाठी मागितल्याने त्यांना बुधवारी दुपारी दिड वाजता लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. महिला पोलिस हेमलता पाटील यांनी लाच स्वीकारली तर लाच स्वीकारण्यास अन्य दोघांनी सहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.

    सुभेदार भीमा उखडू भील, महिला कॉन्स्टेबल पूजा सोपान सोनवणे, महिला पोलिस हेमलता पाटील अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. दरम्यान, 2016 मध्ये जेल अधिकारी डाबेराव यांना अटक करण्यात आल्यानंतर सुमारे सात वर्षांनी जेलमध्ये लाचेची कारवाई झाली हेदेखील विशेष !

    हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.