पाचोऱ्यात शिवसेना-उबाठाने राबविली स्वाक्षरी मोहीम
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. सरकारने कठोर शिक्षेची तरतूद असणारा ‘शक्ती कायदा’ राज्यात लागू करावा, अशा मागणीसाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
बदलापूरच्या घटनेनंतर राज्याच्या विविध शहरात महिला अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सक्षम कायद्याअभावी गुन्हेगारांना कारावासात जाण्याचीही भीती राहिलेली नाही. त्याचा निषेध आणि ‘शक्ती कायदाची’ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी अरूण पाटील, ॲड.अभय पाटील, पप्पू राजपूत, गजू पाटील, संदीप जैन, पप्पू जाधव, तिलोत्तमा मौर्य, अनिता पाटील, जयश्री येवले, कुंदन पांड्या, लक्ष्मी पाटील, फरदिना बानो, मंगलाताई, आशाताई तसेच शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.