साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
चोपडा तालुक्यात सोमवारी, २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या अवकाळी गारपीट आणि पावसाने तालुक्यातील निमगव्हाण, चुंचाळे, मामलदे, तांदळवाडी, डोंदवाडे, चहार्डी, हातेड, संपुले आणि तालुक्यातील इतर भागात विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले दादर, मका, हरभरा, बाजरी, गहू आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (अजित पवार गट) निवासी नायब तहसीलदार महाजन यांना देण्यात आले.
निवेदनावर जेडीसीसी बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, चोपडा कसबेचे चेअरमन प्रवीणभाई गुजराथी, रावेर मतदारसंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील, रा.काँ.चे शहराध्यक्ष गिरीश देशमुख, परेश देशमुख, सूतगिरणीचे संचालक विनोद पाटील, चोपडा तालुका उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर, कार्याध्यक्ष माया महाजन, उपाध्यक्ष जयश्री पाटील, रवींद्र धनगर, मिलिंद सोनवणे, गोपाल दाभाडे, सनी सचदेव, शुभम सोनवणे, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.