भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

0
26

साईमत जळगाव प्रतिनिधी

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे. तसेच नवतंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे. फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे. म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या प्रवाहासोबत जुडवून घ्यावे.

तसेच डॉ. अग्रवाल यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे. यांचे विविध उदाहरणं देत स्पष्ट केले. तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर टिकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. करिष्मा चौधरी, प्रा.रुपाली ढाके, प्रा.विनोद महाजन, प्रा.जितेंद्र कुमार, प्रा. ऐश्वर्या परदेशी, प्रा. वैशाली चौधरी, प्रा.अश्विनी भोळे, प्रा. हर्शिदा तलरेजा, प्रा.मानसी दुसे, प्रा.मनीषा देशमुख आदींनी पार पाडली. सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here