साईमत जळगाव प्रतिनीधी
आईईईई बॉम्बे सेक्शन द्वारा दरवर्षी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन (टेक्नोवेशन) आयोजित करण्यात येते. हा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट एक्सपो आहे. त्यात व्हीएलएसआय, रोबोटिक्स, सायन्सेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या थीम असतात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आईईईई टेक्नोवेशन २०२४ या टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, प्रा. दत्तात्रेय सावंत (चेअरमन स्टुडन्ट ऍक्टिव्हिटीज कमिटी, आईईईई, बॉम्बे सेक्शन, मुंबई) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे(स्टुडन्ट ब्रांच कौन्सिलर), कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख, AI&DS) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रा. ज्योती कुंडले (रामराव अदीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, नवी मुंबई), प्रा. स्वप्नाली माकडे(फादर रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई), प्रा. महेश एन पाटील, प्रा. निलेश चौधरी हे मूल्यांकना करता उपस्थित होते. सदर कार्यक्रम स्टुडन्ट ब्रांच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय मार्फत घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी टेक्नोवेशन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धे मधून विद्यार्थ्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
यावेळी प्रा. दत्तात्रय सावंत यांनी टेक्नोवेशन बद्दल बोलताना राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धेच्या नियमाबद्दल सांगत, विद्यार्थ्यांनी आपल्या मधील कनेक्टिव्हिटी, सिम्पलीसिटी, कोर व्हॅल्यूज, हुम्यानिटी या सर्व गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे जेणेकरून ती भविष्यामध्ये यशस्वी होतील, असे सांगितले. गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या व अशाप्रकार चे कार्यक्रम नियमित राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात जवळपास ४८ वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून १६१ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. ही स्पर्धा जळगाव, छत्रपती संभाजी नगर, परभणी, बुलढाणा, लातूर, जालना, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार अशा दहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी प्रा. हेमंत इंगळे व डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी सूत्रसंचालन नीलाक्षी बर्डे, प्रेरणा पाटील, कोनिका पाटील, हेमाक्षी राणे, हेमांगी बावा व ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी केले.