साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी आज आयबीएम ह्या जागतिक कंपनीच्यावतीने तीन तासांचा जॉब रेडीनेस ट्रेनिंग वर्कशॉप घेण्यात आला. आयबीएमच्या सीएसआर बोक्स तर्फे अहमदाबादच्या तन्वी शाह यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या ट्रेनिंग वर्कशॉपला एमबीए आणि एमसीएचे एकूण २११ विद्यार्थी उपस्थित होते.
वर्कशॉपमध्ये तन्वी शाह यांनी विद्याथ्यांना रेज्युमे काय असतो, एचआर किती वेळ एका रेज्युमेला देतात, तो कसा निवडला जातो, त्याला बनविण्याची योग पद्धत कशी असते, त्यानंतर इंटरव्यू मध्ये कसले प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे कश्याप्रकारे द्यावीत, परिधान कसा असावा, बॉडी लैन्ग्वेज कशी असावी, आत्मविश्वासाने उत्तर कसे द्यावे, स्वतःच्या क्षमतानुसार करिअर कसा निवडावा आणि आयबीएम सारख्या कंपनीत नोकरी कशी मिळवावी, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन आयबीएमच्या पोर्टलवर करण्यात आले.
वर्कशॉपच्या सुरुवातीला आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच त्यांना असल्या संधीतून स्वतःला घडवून बदलत्या काळानुसार एडवांस ट्रेनिंगद्वारे विकसित होण्याचा सल्ला दिला. ह्या वर्कशॉपचे संयोजन आणि सूत्रसंचालन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले. ह्यावेळी प्राध्यापकवर्ग उपस्थित होते