साईमत जळगाव प्रतीनिधी
विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी संस्कृत सप्ताह पाळण्यात येत आहे.
या सप्ताह अंतर्गत संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा शनिवार, दि.२ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका भारती दक्षिणकर यांची उपस्थिती होती. प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी लुंकड हिने तर आभार नंदिनी टाकणे यांनी मानले.
संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कालभैरवाष्टक स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अश्या प्रकारे स्तोत्र अस्खलित संस्कृत भाषेत पठण करून दाखविले. या स्पर्धेत खूपच आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. यातील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देवून गौरविण्यात आले. विजेते प्रथम – सृष्टी बागूल, द्वितीय – सुहृत पवार, तृतीय – तन्मय भावसार
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , जेष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील उपस्थित होते. यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून सुरेखा शिवरामे-बाणाईत, नंदिनी टाकणे, अनिता शर्मा आदींसह शिक्षक, शिक्षकेतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
