साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी)
वेचणी करून घरात साठविलेल्या कापसाला अचानक आग लागून साठविलेला पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी माळेगाव-पिंप्री येथे घडली या आगीत शेतकऱ्यांचा पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने पन्नास हजार रु चे नुकसान झाले आहे.रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता.
माळेगाव-पिंप्री येथील अल्पभूधारक शेतकरी वीरेंद्र आनंदा अहिरे यांनी वेचणी करून ठेवलेला कापूस विना वापरातील घरात साठवून ठेवला होता या घराला अचानक आग लागल्याने आगीत पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शेतकरी पुन्हा नवीन कापूस वेचणी करण्यासाठी शेतात असताना घडली दरम्यान सायंकाळी नविन कापूस वेचणी करून आणल्यावर त्यांना ही घटना कळली तोपर्यंत परिसरातील ग्रामस्थांनी आगीच्या विळख्यातून उर्वरित कापूस वाचविला होता दरम्यान या घटनेचा अद्याप पंचनामा झालेला नव्हता प्राथमिक माहितीनुसार शेतकऱ्याचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणल्यामुळे उर्वरित कापूस आगीतून बचावला आहे.आगीचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.