साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
नारी शक्तीचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. नवरात्री उत्सव हा देवीचा जागर असतो. स्त्री शक्तीला आपण देवीच्या रूपात पाहिले पाहिजे, असे विचार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित निष्कलंक धाम वढोदे येथे कुमारिका (कन्या) पूजन विधी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराजांनी परिसरातून सजून धजून आलेल्या शेकडो कुमारिकांचे पाय धुवून पुसून त्यांचे पूजन केले. त्यांना सन्मानपूर्वक स्वादिष्ट भोजन खाऊ घातले. पुरी, भाजी, खीर, पाणीपुरी, ऊसाचा ताजा रस दिला. त्यानंतर प्रत्येकीला भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी एकदंत महाराज, शशिकांत ठोंबरे, संजीव किसन महाजन, फैजपूर येथील पांडुरंग शेठ सराफ, ॲड. संदीप भंगाळे, पत्रकार तसेच सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आदी मान्यवर उपस्थित होते.