बेघर अतिक्रमण संघर्ष समितीच्या संघर्षाला मिळाले यश
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा नियोजन भवनात नामदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विविध विभागातील अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत धरणगाव शहरातील नेहरूनगर, रामदेवजी बाबानगर, हमाल वाडा, गौतम नगर, संजय नगर, दादाजी नगर, हनुमान नगर, चोपडा रोड, पारोळा नाका लगतच्या परिसर भागातील तसेच विविध भागात राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी गेल्या एक वर्षापासून बेघर अतिक्रमण संघर्ष समितीने लढा सुरू केला होता. त्या लढ्याला आज यश प्राप्त झालेले आहे.
संघर्ष समितीला शहरातील अतिक्रमण धारकांसाठी त्यांनी धरणगाव शहरात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. हा प्रश्न मार्गी लावत असताना बहुतांश विरोधकांनी या कामाला विरोध दर्शविला, हे होणार नाही…हे शक्य नाही…हे कस काय होणार अशी विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण धरणगाव बेघर अतिक्रमण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे तसेच सचिव प्रा.रवींद्र गोकुळ कंखरे यांनी नामदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष सुरू केला. या संघर्षामध्ये सर्वप्रथम धरणगाव शहरातील अतिक्रमण धारकांना धरणगाव बेघर अतिक्रमण संघर्ष समितीमार्फत जाहीर आवाहन करण्यात आले होते. जे अतिक्रमण धारक २०११ पूर्वीचे अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध आहे. अशांना त्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव तयार केला.
बेघर अतिक्रमणधारकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा
एरंडोल भागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केल्यावर समितीने सर्व प्रकाराची चौकशी करून त्यामधील काही शिथीलता मिळविण्यासाठी संचालक नगर रचना, पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी प्रस्तावातील शिथिलता मिळण्यासाठी ज्या मागणीने पाठवले प्रस्ताव मंजूर करून समितीचे अध्यक्ष अँड.वसंतराव भोलाणे व सचिव रवींद्र कंखरे यांच्याकडे दिला. त्यानंतर बेघर अतिक्रमणधारकांना त्यांचे घर मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सर्व काही कालावधी जो लागला त्यात सर्व भागातील अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने मंजूर करायला सुरुवात झाली आहे. त्यात पहिला टप्पा म्हणून नेहरू नगर भागातील अतिक्रमणधारकांना सी.टी.सर्व्हे उतारा नेहरूनगर वासियांना देण्यात येणार आहे. आपण लवकरच नगर वासियांना त्यांचे हक्काचे घर नावावर करणार आहे. त्याबाबतचा उताराही आपण त्यांना देणार आहे.
विकासाला आळा घालणाऱ्यांना धडा शिकविणार
२५ वर्ष आपण नगरसेवक नगराध्यक्ष पदावर असतानाही आपल्याला हे कार्य सुचले नाही. ज्याने केले त्यालाही करू द्यायला अडचणी आणल्या.गेल्या धरणगावच्या विकासाला आळा घालणारे अशांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबांच्या जनतेच्या कामाला ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला अशांना आपण गरीब जनतेची काळजी करावी. त्यांना सहकार्याची भावना ठेवावी. पण काही समाजकंटक लोकांना घर मिळु नये, म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या चुकीच्या अफवा पसरवत आहेत. दिशाभूल करणाऱ्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करावा.
सहकार्य करणाऱ्यांचा भर सभेत आभार मानणार ज्यांनी-ज्यांनी मदत केलेली आहे.
आम्ही त्यांचे भर सभेत जाहीर आभार मानणार आहोत. ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. जनतेच्या कामासाठी व धरणगावच्या विकासासाठी जो कोणी आळा घालणारे आहेत. त्यांना ही गरीब मायबाप जनता येणारा कालखंडात शंभर टक्के धडा शिकवेल, अशा आम्हाला खात्री आहे असे अँड.व्ही.एस.भोलाणे रवींद्र कंखरे यांनी सांगितले.