हिंदू जनजागृती समिती यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले.
साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :
विजयादशमी निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. समिती सेवकांनी पारंपरिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून विधी संपन्न केला.
कार्यक्रमास प्रतापराव गुलाबराव पाटील, हरिभक्त परायण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, तसेच खर्ची येथील रहिवासी बीएसएफ जवान सोपान माळी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात निखील कदम (हिंदू जनजागृती समिती) यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर म्हणाले, शास्त्राचे रक्षण शस्त्र शिवाय होऊ शकत नाही. धर्मरक्षणासाठी शस्त्र ही केवळ परंपरा नसून ती आपल्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची ओळख आहे.शौर्य जागरण शस्त्र पूजन प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र चौधरी यांनी केले.