एम.एम.महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा

0
21

वक्तृत्व, निबंध, पोस्टर लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

येथील एम.एम.महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर ‘हिंदी सप्ताह’ चे आयोजन केले होते. सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, निबंध लेखन, पोस्टर लेखन आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. वक्तृत्व स्पर्धेत १५, निबंध लेखन स्पर्धेत ६० तर पोस्टर लेखन स्पर्धेत ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सप्ताह समापन व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील लेखक, कवी डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ उपस्थित होते.

पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले होते. मंचावर डॉ.शरद पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर, डॉ. जे.डी.गोपाळ, डॉ. के.एस.इंगळे, डॉ.एस.बी.तडवी, डॉ. वाय.बी.पुरी, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्निल पाटील, प्रा नितीन पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ.प्राजक्ता शितोळे, डॉ. शारदा शिरोळे, उपस्थित होते.

प्रा.डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती व भारताची वर्तमान स्थिती यावर विस्तृत प्रकाश टाकला. संस्थेचे व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी मच्छिंद्र जाधव, सुरेंद्र तांबे, बी.जे.पवार, जयेश कुमावत, घनश्याम करोसिया यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा परिचय उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ. क्रांती सोनवणे तर प्रा.संजिदा बानो शेख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here