साईमत, जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे ते सोनवद अशा १० कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे धरणगाव, सोनवद, हनुमंतखेडा, पष्टाणे, धानोरा, अहिरे, झुरखेडा, बाभुळगाव परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. परिणामी सोनवद परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात शासनाच्या बजेट अंतर्गत मार्च २०२३ मध्ये ४ रस्त्यांसाठी २४ कोटी निधी मंजूर केला होता. त्यात धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे- सोनवद ५ कोटी, चोरगाव-चांदसर-पाळधी १० कोटी, लाडली ते रेल फाटा ६ कोटी, मुसळी फाटा ते बोरखेडा ३ कोटी या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव ते सोनवद या १० कि.मी. रस्त्याचे विधिवत पूजा करून लोकार्पण ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, प्रमोद पाटील, दामू पाटील, धर्मराज पाटील, सतखेडे लकर गजानन पाटील, मुरलीधर अण्णा पाटील, शाखाप्रमुख पुंडलिक पाटील, महेश (बबलू) पाटील, हुकुमचंद पाटील, योगराज पाटील, भाजपाचे निर्दोष पाटील, एस. पी. पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, काशिनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुकाराम पाटील, अरविंद मानकरी, भोजचे सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, नाटेश्वर पवार, चंदू शेठ भाटिया, भाऊसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक धानोराचे सरपंच भगवान महाजन, सूत्रसंचालन चंदूशेठ भाटीया तर आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले.