पाळधी विद्यालयात किशोरींना आरोग्याविषयी धडे

0
41

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील स. न. झंवर विद्यालयात ओव्हरसीज हेल्थ केअरतर्फे किशोरवयीन मुलींसाठी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.हिना चौधरी यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन करुन धडे दिले. कार्यक्रमात मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी मुलींमध्ये होणारे हार्मोनलबदल वेदना मुक्ती वैयक्तिक स्वच्छता गैरसमज आणि वास्तव याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका शोभा तोतला, कल्पना झवर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय प्रतिनिधी आनंद नन्नवरे, मनोज जैन यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here