साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून द्रुपदाबाई वाचनालयाचे सचिव युवराज पाटील उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महापुरुषांविषयी माहिती दिली. तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी वाचन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. वाचन प्रेरणा दिनाविषयीचे महत्त्व सांगितले. स्वच्छतेचे महत्त्व सांगून हात धुवा दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यालयात असलेल्या हॉलसाठी पंखा सप्रेम भेट दिला. विद्यालयाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे तर आभार बी.एन.पाटील यांनी मानले.