जामनेरातील ज्ञानगंगा विद्यालयाचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत वर्चस्व

0
29

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील जिकरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेर येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्चस्व मिळविले आहे. स्पर्धेत २२ शाळांचा समावेश होता. तसेच त्यात १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथील जिकरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

आपल्या विद्यालयातील १७ वर्ष वयोगटातील ३ विद्यार्थिनींची तर १७ वर्ष वयोगटातील १ विद्यार्थी अशा वैयक्तिक चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यात साक्षी राजेंद्र तेली, नाजूका सुनील कुंभार, भूमिका सुनील शिंदे, अजय कांतीलाल नाईक यांचा समावेश आहे. विजयी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व्ही.एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी खेळाडूंचे यांनी केले कौतुक

सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा मंत्री गिरीष महाजन, सचिव तथा नगराध्यक्षा साधना महाजन तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. शिवाजी सोनार यांच्यासह सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.जे.सोनवणे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here