गरजूना सीटीइटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन शिबीर

0
14

साईमत सावदा तालुका रावेर प्रतिनिधी

येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सी.टी.इ.टी.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेत बसणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे. ही परीक्षा त्यांना अवघड जाऊ नये, यासाठी येथील सोहेल खान फाउंडेशनच्या वतीने एक दिवशी सी.टी.इ.टी.मार्गदर्शन शिबीर शहरातील ख्वाजा नगर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.

सोहेल खान फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल खान सैईदुल्ला खान,अय्यूब सर, पत्रकार फरीद शे, युसूफ शाह आदींनी सदर शिबीराचे आयोजण केले होते. शिबिरास जिल्ह्याभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक अली अंजूम रिज़वी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

कॅम्पचे अध्यक्षस्थानी सावदा येथील डॉ.अन्सार खान गुलाम गौस खान होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा राष्ट्रवादीची मझहर खान, जळगाव उदगटृष्टीचे अनीस शाह, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, शकील शेख, सैय्यद बशारत अली, मुख्याध्यापक जबर खान, डॉ.लियाकत, शरीफ सर, ज्येष्ठ पत्रकार श्याम पाटील, सावदा शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी आदिंची उपस्थिती होती.

काही कामानिमित्त कार्यक्रमाला येऊ न शकल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शैक्षणिक व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी समाजाने आपापसातील हेवे दावे विसरून एकत्र येणे व सर्वसमावेशक विचारधारा ठेवणे काळाची गरज आहे. असे मनोगत जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षक अली अंजूम रिज़वी यांनी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर अधीक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, सोहेल खान फाउंडेशनच्या वतीने जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांना “रहेबर ए मिल्लत”तर डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून शेख यांना “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलाउद्दीन अदीब यांनी केले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे सदस्य कलीम जनाब, निसार अहमद, शेख कमरूद्दीन, शेख अनीस, मोईन खान, मोहसीन शाह आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here