साईमत जळगाव प्रतिनिधी
मोदी आवास व शबरी आवास योजनेतर्गत ग्रा. पं. 150 घरकुल मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. चोरगाव ते निभोरा या 4 किमीच्या रस्त्यावरील मोऱ्यासह लवकरच डांबरीकरण सुरु करणार आहे. परिसरातील चौफेर शेतीचे रस्ते मार्गी लावणार असून लोकसभा निवडणुकीनंतर चोरगावचे नामकारण करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चोरगावचे गावाचे नाव बदलविण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणी नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी व्यासपीठावरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानुसार ग्रा.पं. तिने तत्काळ परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही दिल्या. ते चोरगाव येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
तालुक्यात सर्वात जास्त मोदी आवास योजनेतर्गत 110 व शबरी आवास योजनेतर्गत 40 असे एकूण 150 घरकुल मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रा.पं.तिचे कौतुक केले. यावेळी मंजूर घरकुल धारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठ पुराव्याने चोरगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत धार ते चोरगाव या रस्त्यावर 3 कोटी निधीतून बांधण्यात आलेल्या 3 पुलांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी धा रस्ता रस्ता काँक्रिटीकरण 5 लक्ष, शाळा खोल्या बांधकाम- 25 लक्ष, आमदार निधीतून सभामंडप – 10 लक्ष, जलजीवन मिशन मधून पाण्याची टाकी बांधकाम व बोअरवेल – 61 लक्ष धार ते चोरागाव रस्ता डांबरीकरण – 60 लक्ष, चोरगाव ते फुपनी रस्ता डांबरीकरण- 60 लक्ष, स्मशानभूमी बांधकाम – 10 लक्ष, डिजिटल अंगणवाडी बांधकाम – 15 लक्ष, तलाठी कार्यालय बांधकाम – 22 लक्ष, कब्रस्थानास संरक्षक भिंत बांधकाम – 5 लक्ष अश्या सुमारे 10 कोटींच्यावर कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यामुळे गावाचा कायापालट होतांना दिसत असल्याने ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कार्याक्रमचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक बी. जे. माने यांनी केले. आभार ग्रा. पं. सदस्य नाना सोनवणे यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, सरपंच उषाबाई सोनवणे, नाना सोनवणे, उपसरपंच प्रवीण पवार, ग्रा.पं.सदस्य किशोर झंवर, हिराबाई सोनवणे, सरला पवार, लताबाई सोनवणे, निर्मला पवार , सचिन पवार, सुधाकर पाटील, गुलाब सोनवणे, बोरगाव सरपंच मिलिंद पाटील, माजी सभापती सचिन पवार यांच्या सह परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.