Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादांनी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज
    राज्य

    ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादांनी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज

    saimatBy saimatAugust 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : खास प्रतिनिधी

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.

    ९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत संपूर्ण देशात स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांना स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. गावपातळीवर यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यात सहभागी होताना पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली.

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हजारो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले जात आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येकांनी यात सहभागी व्हावे, आणि आपला हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांचे स्मरण करावे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Maharashtra Weather : महाराष्ट्रावर दुहेरी हवामान संकट; 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.