मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले माल्यार्पण
साईमत/दोंडाईचा/प्रतिनिधी :
येथील जनदरबार कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ज्ञ, प्रखर राष्ट्रवादी नेते, भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
यावेळी भाजपाचे शिंदखेडाचे तालुकाध्यक्ष (दोंडाईचा ग्रा.) दीपक बागल, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, जिल्हा सरचिटणीस डी.एस.गिरासे, माजी शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगरसेवक निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, नरेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, पप्पू धनगर, के.पी.गिरासे, उमेश वाडीले, जी.के.गिरासे, जनदरबार कार्यालय प्रमुख रामकृष्ण मोरे आदी उपस्थित होते.
डॉ. मुखर्जी यांच्या विचारांवर चालण्याचा केला निर्धार
यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाला आणि बलिदानाला उजाळा मिळाला. “एका देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाहीत,” अशी सिंहगर्जना करत काश्मीरच्या संरक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या डॉ. मुखर्जींचे जीवन देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.