विद्यार्थ्यांना हिरव्या रंगावर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमधील पूर्व प्राथमिक विभागात नुकताच ‘ग्रीन कलर डे’ साजरा करण्यात आला. उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान विद्यार्थ्यांना हिरवा रंगाची ओळख करून देणे तसेच निसर्गातील त्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.
यादिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षक हिरव्या रंगाच्या विविध छटांचे कपडे परिधान करून उपस्थित होते.
यादिवशी टेबलवर हिरव्या रंगाचे फळे, भाज्या तसेच वेगवेगळे क्राफ्ट पेपरच्या वस्तु बनवून चार्टवर सुंदररित्या सजविण्यात आले होते. त्यात ज्युनिअर केजीसाठी पानांमध्ये रंगभरण, सिनिअर केजीसाठी आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे हे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. शिक्षकांनी हिरवा रंग हा निसर्ग, वाढ, ताजेपणा व आरोग्याचे प्रतीक असल्याचे सोप्या शब्दात समजावून सांगितले. झाडे व वनस्पती आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत, त्याचीही माहिती देण्यात आली. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हिरवा रंग ओळखता आला. तसेच निसर्गाविषयी प्रेम व जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमास प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका अनघा सागडे, कांचन सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या प्रमुख सायली ईखे होत्या.
