अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटींचे अनुदान मंजूर – आ.किशोर आप्पा पाटील

0
4

                                   शेतकऱ्यांचा गुढी पाडवा गोड होणार!

साईमत पाचोरा प्रतिनिधि

पाचोरा- भडगाव – सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत आणि अवेळी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे पाचोरा- भडगाव मतदार संघातिल ८६७३३ शेतकर्‍यांना सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर १०० टक्के हा निधी पडणार आहे. त्यामुळे येणारा गुढीपाडवा हा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंना गोड जाणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,भाजपाचे मधुकर काटे, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, सुनिल पाटील,गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, सुमित सावंत आदी उपस्थित होते.

आ.किशोर आप्पा पाटील म्हणाले की, राज्यातय आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमानुसार पाचोरा तालुक्यातील ५१,०६६:७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. पाचोरा ५२३६४ शेतकऱ्यांना एकूण६९:४५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच, भडगाव तालुक्यातील २२,१००:१५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते .३४३६९ शेतकऱ्यांना एकूण 30:४५ कोटींचे अनुदान मिळणार आहे.

शेतकर्‍यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT पोर्टलद्वारे वितरित केले जाणार आहे. यासाठी महसूलचे अधिकारी प्रांत, तहसीलदार, तलाठी यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहेत.
अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” केंद्रात जाऊन तत्काळ E-KYC करावी जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणारे तात्कालीन माजी मुख्यमंञी एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंञी व जिल्ह्याचे मंत्री अनिल पाटिल यांचे आभार आमदार किशोर पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here