जात पडताळणीसाठी शासनाकडून एक वर्ष मुदतवाढ

0
9

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या कोळी समाजाच्या काही नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर देत नसल्याने जिल्ह्याभरातील काही लोकांना अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु ही अडचण लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शासनाद्वारे या लोकांना एक वर्षाची मुदत वाढवून दिल्याने मंत्री गिरीश महाजन यांचे कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने आभार मानले आहे. तसेच यावेळी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी व समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे साकडे घालण्यात आले.

राज्याच्या विविध जिल्ह्यात अर्ज केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाला जाचक अटी न लावता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी कटीबध्द आहोत, असे सांगण्यात आले.

यावेळी चंद्रकांत कोळी, रवी कोळी, सोपान कोळी, जामनेरचे टायगर अप्पा, संतोष कोळी, विनोद कोळी, यावलचे सागर कोळी, नितीन सपकाळे, सुजित कोळी, बंड कोळी, सोपान कोळी, विनायक कोळी, शरद कोळी, सदाशिव कोळी, राजु कोळी, सुधीर तायडे, सुनील सपकाळ, सावन कोळी यांच्यासह कोळी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here