प.वि.पाटील विद्यालयात गोविंदांचा जल्लोष

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना तायडे , दिपाली चौधरी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पारंपारिक पोशाख परिधान करून दांडिया तसेच गरबा रास खेळली. मच गया शोर सारी नगरी रे….., गोविंदा रे गोपाला….. विविध गीतांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य केले. गोविंदाचे एकावर एक थर लावून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. त्यानंतर विद्यार्थ्यांना लाडू व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका कायनात सय्यद तसेच मंगल गोठवाल यांनी केले तर नियोजन योगेश भालेराव यांनी केले सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here