Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»मौलाना आजाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता
    पाचोरा

    मौलाना आजाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द,पारशी, जैन समुदायाच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन-प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहु महाराज संशोधन – प्रशिक्षण मानव विकास संस्था, महात्मा फुले संशोधन -प्रशिक्षण संस्था, आदिवासी शिक्षण – प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र उन्नती – प्रशिक्षण प्रबोधनी आदी स्वायत्त संस्थाच्या धर्तीवर अल्पसंख्यांक संशोधन -प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. कार्यालयासाठी ११ पदे निर्माण करण्यासह साडे सहा कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली आहे. मौलाना आजाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MARTI) संस्थेमुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आता संस्थेद्वारे जेईई, नीट यासारख्या स्पर्धा परीक्षासाठीचे प्रक्षिशणासह संशोधनासाठी आर्थिक मदत शक्य होणार आहे.

    मार्टी कृती समितीचे जळगाव जिल्ह्यासह मार्टी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अझहर पठाण यांनी संभाजीनगरातून मागणीला सुरवात केली होती.अल्पसंख्यांक समाजातील अनेक तरुण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जात आहेत. अल्पसंख्यांक समाजातील तरूणाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाठी राज्यात “मार्टी रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट” स्थापनेची मागणीसाठी मागील चार वर्षापासून लढा सुरू होता. मार्टी संस्था स्थापन करण्यासाठीचा पाठपुरावा कृती समितीकडून करण्यात येत होता. अखेर राज्य सरकारने राज्यात अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही संस्था अल्पसंख्यांक विकास विभागाध्यक्ष अधिपत्याखाली असणार आहे.

    सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांनी मागणीला दिला पाठिंबा

    अल्पसंख्यांक समाजातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी, अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी चार वर्षांपासून सरकारकडे संस्थेची मागणी करीत होते. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला. मार्टी संस्था स्थापन करण्याची राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

    -ॲड. अमजद पठाण, जळगाव जिल्हाध्यक्ष,
    अल्पसंख्यांक संशोधन-प्रशिक्षण संस्था कृती समिती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.