साईमत चोपडा प्रतिनिधी
भगिनी मंडळ संचलित, ललित कला केंद्र, चोपडा (Chopda) येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान “मेरी माटी मेरा देश” हा पंचप्रण शपथ ग्रहण सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी ललित कला केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसह उपस्थित प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत भारत भूमीची पवित्र माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण करण्यात आले. यावेळी पंचप्रणाचे वाचन प्रा. संजय नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य बारी यांनी केले.
याप्रसंगी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य प्रा.सुनिल बारी, बालक मंदिराचे मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी, नर्सिग स्कूलचे प्राचार्य अश्पाक पिंजारी, प्रा. शुभांगी पारखे, प्रा. विनोद पाटील, प्रसन्न गुजराथी, भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.