आधार कार्ड मोफत उपडेट साठी सरकारने वाढवली मुदत

0
26
आधार कार्ड मोफत उपडेट साठी सरकारने वाढवली मुदत-www.saimatlive.com

साईमत प्रतिनिधी

मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्तेत दाखल होताच जनतेसाठी एक दिलासा पूर्वक निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने मोफत आधार कार्ड अपडते करण्यासाठी मुदत पुन्हा वाढवुन दिली आहे. गेल्या अनेक वर्ष पासून ही मुदत सातत्याने सरकारकडून वाढविण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट, वीजेचा लपंडाव पाहता सरकारकडून मुदत वाढ दिली असेल. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपला खिसा रिकामा करावा लागणार नाही.

आधार कार्डला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर त्याला अपडेट करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड मोफत रित्या अपडेट करण्यासाठी यापूर्वीची तारीख 14 मार्च होती.त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत सरकत तर्फे मुदत वाढ देण्यात आली होती. ही डेडलाईन जवळ येताच पुन्हा एकदा मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला. आता आधार कार्ड धारकांना 14 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे, याविषयीची माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिली आहे. नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन सुविधेचा लाभ घेता येईल. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर अपडेट करण्यासाठी ही संधी आहे.

या प्रकारे करा आधार कार्ड अपडेट

UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा

अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा

12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा

ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा

आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा

‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

ऑफलाईन अश्या प्रकारे करा अपडेट

https://shuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत पोर्टलवर जा

आता जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी ‘निअर बाय सेंटर’ वर क्लिक करा

तुमचा योग्य पत्ता द्या. लोकेशन व्हेरिफिकेशन होऊन जवळचे केंद्र सापडेल

पिन कोड टाकून सुद्धा तुम्हाला जवळचे आधार केंद्र सापडेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here