गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी बनविले सौर उर्जेवर चालणारे वाळू चाळणी यंत्र

0
15

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील यंत्र विभागामध्ये, अंतिम वर्षात शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारे वाळू चाळणी यंत्र बनविले आहे.

वाळू चाळणी सहसा नदीपात्रामध्ये, मुजरांद्वारे केली जाते, सदर प्रक्रिया खूपच श्रमिक, तसे वेळ घेणारी असते. तसेच नदीपात्र असे ठिकाण आहे, जिथे विद्युत ऊर्जा उपलब्ध नसते, त्यामुळे विद्युत उर्जेवर चालणारे, कुठलेही यंत्र वापरण्यास अडचण येते. ही बाब लक्षात घेऊन, तसेच वाळू मजुरांशी चर्चा केल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, हा प्रश्न आपण सौरऊर्जेद्वारे सहज सोडवू शकतो. सदर यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून, ती बॅटरी मध्ये साठवली जाते. विद्युत ऊर्जेच्या मदतीने इलेक्ट्रिक मोटार फिरविली जाते. इलेक्ट्रिक मोटार पासून मिळणारे रोटरी मोशन, क्रँक मेकॅनिझमच्या साह्याने, व्हायब्रेटरी मोशन मध्ये, रूपांतरित केले जाते, व सदर चाळणी यंत्र कार्यान्वित होते. सदर यंत्राची क्षमता ताशी २ क्विं. वाळू गाळणी करण्याएवढी आहे. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर, सदर यंत्र सतत ३ तास चालू शकते.

हा प्रकल्प करताना विद्यार्थी मनीष कोलते, शुभम शिंपी, भूषण पाटील, आणि मो.शेहजाद खान यांना मार्गदर्शक प्रा.प्रवीण पाटील, प्रकल्प समन्वयक प्रा. किशोर महाजन, व विभाग प्रमुख प्रा.तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here