उपाध्यक्षपदी संजय करंदे यांचा बिनविरोध निवडीत समावेश
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कुल पाचोरा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी पर्यवेक्षक ए.बी.अहिरे तर उपाध्यक्षपदी शाळेचे क्रीडा प्रमुख संजय करंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर पतपेढीच्या अध्यक्षा पी.एम. वाघ, सचिव आर. एल.पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी अभिनंदन केले आहे.
