पाचोऱ्यातील गो.से. हायस्कुलला मूल्यांकन समितीने दिली भेट

0
64

विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण, उपाय योजनाबाबत जाणून घेतली माहिती

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

येथील श्री.गो.से.हायस्कुल येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा दोन शाळा मूल्यांकन समितीचे प्रमुख विनोद धनगर, रवींद्र शिंदे, श्री.ठोके यांनी नुकतीच शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजनाबाबत माहिती जाणून घेतली.

समितीने विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, बास्केटबॉलचे मैदान, व्यायामशाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान /गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय, ई लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला गृह, मुख्याध्यापक कक्ष, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक दालन, शिक्षक बंधू-भगिनी यांचे दालन, हॅन्ड वॉश, सुरक्षा ऑडिट, सूचना/तक्रार व प्रथमोपचार पेटी, ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन, पावसाच्या पाण्याची व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सरल प्रणाली व यु-डायस प्रणाली आणि ऑनलाईन माहिती पॅट अंतर्गत सर्व माहिती जाणून घेण्यात आली.

अभिलेख तपासून व्यक्त केले समाधान

समितीने विद्यार्थ्यांच्या संचयिका, शिष्यवृत्ती आणि सर्व शालेय अभिलेख तपासून समाधान व्यक्त केले. समितीला शाळेचे मुख्याध्यापक एन. आर.पाटील, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका यांनी सर्व अभिलेखे दाखविले. याकामी कार्यालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here