साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे जागर अमृत महोत्सवाचा या कार्यक्रमांतर्गत कारगिल युद्धात विशिष्ट सेना मेडल प्राप्त व सेवा निवृत्त निरीक्षक सुरेश भिला पाटील हे प्रमुखअतिथी म्हणून उपस्थित होते.
देश सेवेचा सार्थअभिमान,जवानांविषयी आत्मीयता तसेच कारगिल युद्धातील विजयी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर सादर करतांना त्यांनी देशप्रेम, त्याग, बलिदान व योगदान यांचे महत्व प्रतिपादन केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम. वाघ अध्यक्षस्थानी होत्या. तसेच कार्यक्रमास पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. उज्वल पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन आर. बी. कोळी यांनी केले.