मला पुन्हा संधी द्या, मतदारसंघाचे नंदनवन करणार :आ.किशोर आप्पा पाटील यांची ग्वाही

0
6

शेतकरी मेळाव्यात विरोधकांचा घेतला खरपूस समाचार

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

गेल्या दहा वर्षांत केलेली रस्ते, गटारी, पूल, शेत रस्ते यांच्यासह विविध विकास कामे सांगून मला पुन्हा एकदा संधी दिल्यास मी मतदार संघाचे नंदनवन करेल, अशी आ. किशोर आप्पा पाटील यांनी ग्वाही दिली. तसेच माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी सभापती सतिष शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीत केलेल्या कामांचे वाभाडे काढून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीत वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळाव्याच आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सभेत वर्षभरात केलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, वार्षिक उलाढाली, नफा-तोटाबाबत सभापती गणेश पाटील यांनी माहिती दिली. व्यासपीठावर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, उपसभापती पी.ए.पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भुरा आप्पा पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, प्रवक्ते प्रदीप देसले, सचिव बि.बी.बोरुडे आदींची उपस्थिती होती.

नैसर्गिक सुत्रावर पाऊस अवलंबून

प्रास्ताविकात सभापती गणेश पाटील यांनी आ. किशोर पाटील यांनी दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. पुन्हा त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत व पावसाचे नैसर्गिक सुत्रावर पाऊस अवलंबून असल्याचे सांगून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here