साईमत जळगाव प्रतिनिधी
शेतकऱ्याकडे मागिल वर्षाचा कापुस घरात आहे, यावर्षीही ऊत्पन्न फारच कमी आले आहे. शेतमालाला योग्य भाव नाही. अतिशय बिकट परिस्थितीत शेतकरी सापडला आहे. ग्रामिण भागात तरुण आत्महत्या करीत आहेत. यासाठी शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.
बळीराजा जयंतीच्या निमित्ताने (बलिप्रतिपदा ) येथे सालाबादाप्रमाणे मराठासेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड, मराठा प्रिमियर लिग परिवर्तन चळवळ व बहुजन समाजाच्या वतीने आयोजित बळीराजा पुजन वंदन कार्यक्रमात श्री. देवकर बोलत होते.
यावेळी मराठासेवा संघाचे विभागिय कार्याध्यक्ष रामदादा पवार, माजी विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण , सुमित पाटील, जिजाऊ ब्रिगडच्या जिल्हाध्यक्षा लिना पवार, सुचिता पाटील, ऊद्योजक प्रा.डी डी बच्छाव, श्रीराम पाटील, मार्केट कमेटीचे अध्यक्ष शामकांत सोनवणे , माजी नगरसेवक ललित कोल्हे, वाल्मिक पाटील, खुशाल चव्हाण, नाट्यकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील, एमपीएलचे राहुल पवार, प्रफुल पाटील, पुरुषोत्तम चौधरी, राहुल पाटील, मुकुंद सपकाळे, दिलिप सपकाळे, मधुकर पाटील, चंद्रकांत देसले, मधुकर पाटील, संजय चव्हाण, सचिन चव्हाण , डॉ. दिलिप पाटील आदिंची उपस्थिती होती. सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.