साईमत लाईव्ह कजगाव ता भडगांव प्रतीनिधी
वृक्षारोपण वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. शुद्ध हवा लोकांना निरोगी बनवते. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. या सर्व गोष्टींचा विचार करत आयसीआयसीआय फाउंडेशन तर्फे आलेल्या श्री गणेश बोरगे सर आणि श्री अजिंक्य सर यांनी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पारोळा रोड, कजगाव आणि शारदा विद्यानिकेतन (सेमी-इंग्रजी), कजगाव या शाळेला भेट देऊन विविध प्रकारच्या 300 रोपांची शाळेला भेट देत वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. भेट देते वेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुनील चव्हाण सर, संस्थेचे सचिव माननीय श्री नंदकुमार चव्हाण सर, इंग्रजी माध्यम विभागाचे मुख्याध्यापक श्री निलेश मोरे सर, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संदीप बिऱ्हाडे सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
मानवी जीवनात वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांना लक्षात यावे यासाठी दिनांक 29-08-2022 वार सोमवार रोजी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पारोळा रोड, नवीन इमारत, कजगाव येथे इयत्ता 9वी आणि 10वी या वर्गांच्या विद्यार्थ्यांकडून जलसुरक्षा(Water Security) या विषयांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुनील चव्हाण सर व संस्थेचे सचिव माननीय श्री नंदकुमार चव्हाण सर तसेच श्री संदीप बिऱ्हाडे सर, श्री सुनील जाधव सर यांनी स्वतः हातभार लावत वृक्षारोपणास शोभा आणली.