साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि दिशा गॅस एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना गॅसच्या सुरक्षेविषयी प्रशिक्षणाद्वारे धडे देण्यात आले. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहकांसाठी असलेल्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच दिशा गॅस एजन्सीतर्फे विद्यार्थ्यांना गॅस वापराबाबत प्रशिक्षण व गॅस वापरतांना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा स्मिता चंद्रात्रे, माजी अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड.भारती अग्रवाल, जिल्हा बँकिंग तथा सायबर प्रमुख विजय शुक्ल, जिल्हा सहसंघटक मकसूदभाई बोहरी, सक्रिय सदस्य तथा साने गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, दिशा गॅस एजन्सीचे मॅनेजर दिनेश रेजा, लेखक-कवी तथा पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर, सदस्य विमल मैराळे, मिलिंद निकम, लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक मनोहर महाजन यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी मानले.