Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Gang fights at hotel on Shirsoli Road : शिरसोली रस्त्यावरील हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस ; मालकासह कामगारांनाही केली शिवीगाळ
    क्राईम

    Gang fights at hotel on Shirsoli Road : शिरसोली रस्त्यावरील हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस ; मालकासह कामगारांनाही केली शिवीगाळ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 20, 2025Updated:May 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन टोळक्याने काढला पळ

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील शिरसोली रस्त्यावरील असणाऱ्या ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ नावाच्या हॉटेलमध्ये रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने धुडगूस घालत तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही सोबत घेऊन पळ काढला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अशा घटनेमुळे परिसरातील हॉटेलच्या मालकांसह व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

    सविस्तर असे की, शिरसोली रस्त्यावरील हॉटेल ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ येथे काही तरुण जेवणासाठी आले होते. त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये अचानक वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करत हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हॉटेलचे मालक आणि कामगारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही शिवीगाळ केली.

    धुडगूस घालणारे ‘टोळके’ पसार

    घटनेची एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच धुडगूस घालणारे ते ‘टोळके’ तेथून पसार झाले. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टोळक्याने हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही तोडून सोबत नेल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.